‘नाम बडे और दर्शन छोटे’ असं आरसीबी बाबतीत नेहमी म्हटलं जायचं. विराट कोहली, ख्रिस गेल आणि डिव्हिलिअर्स यांच्यासारखे मोठे खेळाडू असूनही आरसीबी जिंकत नाही. या गोष्टीवरून आरसीबीला समाज माध्यमांवर ट्रोल केलं जायचं, पण गेल्या पाच आयपीएलच्या हंगामात आरसीबी चार वेळा टॉप 4 साठी पात्र ठरले आणि यात एकदा जिंकून ट्रॉफीचा दुष्काळदेखील आरसीबीने संपवला, पण जे गेल्या काही वर्षात होतंय तो एक निव्वळ चमत्कार नसून त्यामागे मेहनत आणि चांगले निर्णय आहेत. नेहमी खेळाडू हे कोणत्याही संघाचा चेहरा असतात, पण जेवढी मेहनत खेळाडू घेतात तेवढीच प्रशिक्षकदेखील घेतात. तर हे खेळाडू होते आपण जाणून घेऊ.
हेही वाचा – CSK vs RCB Controversy: IPL 2026 मध्ये राडा, स्टेडियमवरील 'त्या' गाण्यावरून CSK आक्रमक; RCB विरोधात BCCI कडे तक्रार
दिनेश कार्तिकने 2022-2024 या काळात आरसीबीसाठी खेळाडू म्हणून चांगली कामगिरी केली. 2024 मध्ये निवृत्ती घेतली. त्यानंतर त्याने फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक या पदाची धुरा सांभाळली. त्याच्या मार्गदर्शनाखाली आरसीबीने पहिल्याच वर्षी जेतेपद पटकावले. लिलावाआधीच्या बैठकांमध्ये तो किती हुशारीने विचार करतो हे सगळ्यांनीच समाज माध्यमांवर पाहिलं. आरसीबीच्या यशात दिनेश कार्तिकचा मोठा वाटा आहे. त्याचा मैदानावरचा अनुभव आरसीबीला कामी येत आहे.
हेही वाचा – Who Will Be the New Captain on Team India | IPL मध्ये दमदार परफॉर्मन्स, भारताच्या T20 संघाच्या कर्णधारपदी कोणाची वर्णी?
अँडी फ्लॉवर हा जागतिक क्रिकेटमधील अत्यंत यशस्वी आणि प्रभावशाली प्रशिक्षकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. 2009 ते 2014 या काळात इंग्लंड संघाचे संचालक असताना त्यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. त्यांच्याच कार्यकाळात इंग्लंडने 2010 चा आयसीसी T20 विश्वचषक जिंकला आणि 2011 मध्ये कसोटी क्रमवारीत जगात प्रथम स्थान पटकावले. विशेष म्हणजे, त्यांनी इंग्लंडला तीन वेळा 'ॲशेस' (2009, 2010/11 आणि 2013) जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली, ज्यात ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयाचाही समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबतच फ्रँचायझी क्रिकेटमध्येही त्यांचा दबदबा असून त्यांनी मुलतान सुलतान्स (पीएसएल), गल्फ जायंट्स (आयएलटी20), ट्रेंट रॉकेट्स (द हंड्रेड) आणि मराठा अरेबियन्स यांसारख्या विविध संघांना विजेतेपद मिळवून देत आपली अष्टपैलू प्रशिक्षण क्षमता सिद्ध केली आहे. आरसीबीला जेतेपद जिंकवून त्याने आयपीएलमध्येदेखील त्याचं नाव मोठं केलंच, पण आरसीबीचा ट्रॉफीचा दुष्काळदेखील संपवला. त्याची खेळाडूंची पारख आणि निर्णय क्षमतेचा आरसीबीला फायदा होत आहे. अँडी फ्लॉवर ऑगस्ट 2023 पासून बंगळुरूसोबत आहेत.